“भगव्या रंगाची साडी घालून नवनीत अक्कानीही डान्स केला” - Sushma Andhare | Navneet Rana

2023-01-18 12

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोन प्रमुख भूमिकेत असलेला ‘पठाण’ चित्रपट अलीकडे खूप चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. या गाण्यात दीपिका पादुकोणने भगव्या रंगाची बिकीनी परिधान केल्याने वाद निर्माण झाला होता. भाजपाच्या नेत्यांनी सुद्धा या गाण्यावर आक्षेप घेतला होता. यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर जळजळीत टीका केली आहे. बीड येथील कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यात बोलत असताना त्यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला.

#shahrukh_khan #pathaan #deepikapadukone #sushmaandhare #bjp #saffron #navneetrana #narendramodi #maharashtra #nanapatole #ncp #congress #satyajeettambe #shivsena #hwnewsmarathi

Videos similaires